१ मे पासून मिळणार डिजीटल सात-बारा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यातील १६०२ तलाठी सजांपैकी १५९० गावांचे सात - बारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. ऑनलाइन सात-बारा संगणकीय प्रणालीमध्ये नगर जिल्हा नाशिक विभागात पहिल्या क्रमांकावर आहे. केवळ बारा गावांचे सात बारा संगणकीकरणाचे काम बाकी असून, येत्या आठवडाभरात ते पूर्ण करण्याचे काम जिल्हा प्रशासना मार्फत युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती महसूल शाखेचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सात-बारा संगणकीय प्रणालीमध्ये नगर जिल्ह्याचा राज्यात १६ वा क्रमांक, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील नगर , नेवासा , पाथर्डी , पारनेर,राहुरी आणि श्रीगोंदा या सहा तालुक्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. सात-बारा प्रणालीमध्ये कर्जत, शेवगांव , अकोले, कोपरगाव, राहुरी, जामखेड, श्रीरामपूर आणि संगमनेर या तालुक्­यातील १२ गावांचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे येत्या एक मे अर्थात महाराष्ट्र दिना पासून नागरिकांना डिजिटल सात बारा उपलब्ध होणार आहे.

या प्रणालीमुळे प्रशासन गतिमान होणार असून, या कामात पारदर्शकता येणार आहे. या प्रणालीमुळे दुय्यम निबंधक येथील ज्या काही खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहे ते तालुक्­याच्या ठिकाणी फेरकक्षात येईल. त्यानंतर संबंधित तलाठीकडे जाऊन मग मंडलाधिकाऱ्यांकडे जाणार आहे आणि त्यामुळे खरेदी करणाऱ्याचा सात-बाराही तयार होणार आहे. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या कामात गुणवत्ता कशी टिकून राहील. याची खात्री करण्यासाठी केलेल्या कामाची क्रॉस चेकिंगही केली जात आहे. जिल्ह्यात एकूण १६०२ गावे आहेत. त्यापैकी १५९० गावांचे ऑनलाइन सात-बारा संगणकीयचे काम पूर्ण झाले असून. उर्वरित १२ गावांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या उताऱ्यात तलाठ्यांना काहीही हस्तक्षेप करता येणार नाही. जर बदल करावयाचा असेल तर तो तहसीलदार यांच्या परवानगीनेच करावा लागेल.

ऑनलाइन सात-बारामुळे नागरिकांना लाभ-जिल्हाधिकारी महाजन.नागरिकांच्या वेळ, श्रम आणि पैशांची बचत व्हावी व सात-बारा विना कटकटीने नागरिकांना उपलब्ध व्हावा. राज्य सरकारच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उतारे ऑनलाइन करण्यात येत आहेत. हा उपक्रम हितकारक व पथदर्शी सिद्ध होईल. मागील दोन वर्षांपासून अधिक काळापासून ऑनलाइन सात-बाराचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात १२ लाख ५४ हजार ७७१ सातबाऱ्यांची संख्या आहे. जिल्ह्याचे आतापर्यंत ९९ :२५ टक्के काम पूर्ण झाले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिली.

तालुकानिहाय गावे.अहमदनगर - १२० , नेवासा - १२७ , पाथर्डी - १३७ , पारनेर - १३१ , राहुरी - ९६ , श्रीगोंदा - ११५ , कर्जत - ११७ , शेवगांव - ११२ , अकोले - १८९ , संगमनेर - १६९ , कोपरगाव - ७८ , राहाता - ६० ,जामखेड - ८५ , श्रीरामपूर - ५४ आशा एकूण १६०२ गावांपैकी १५९० गावात सात-बारा ऑनलाइन संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.