मुख्यमंत्र्यांच्या संबंधांचा उपयोग करत 'संगमनेर जिल्हा' करा.आ.थोरातांचा विरोधीपक्षनेते विखेंना टोला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध स्नेहाचे आहेत. त्याचा उपयोग करुन संगमनेर जिल्हा करावा, असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. थोरात यांनी पत्रकाद्वारे जिल्हा विभाजनासंदर्भात आपली भूमिका रात्री उशिरा जाहीर केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गुरुवारी विखे यांची जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन संगमनेर जिल्ह्याची मागणी केली होती. यावेळी विखे यांनी पाठिंबा दर्शवत याआधीच संगमनेर जिल्हा व्हायला हवा होता. पालघरचे विभाजन झाले, मग संगमनेरचे का झाले नाही असा चिमटा थोरात यांना काढला होता. या पार्श्वभूमीवर थोरात यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. 

थोरात म्हणाले, मी फार छोट्या जिल्ह्यासाठी अनुकूल नाही. मोठ्या जिल्ह्याची एक वेगळी ताकद राज्यात असते, या मताचा मी आहे. नगर जिल्हा विभाजनाचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला आहे. परंतु आर्थिक नियोजनाअभावी नवे जिल्हा निर्माण करणे अवघड आहे, असे सरकारचेदेखील मत होते. 

ठाण्याचे विभाजन करुन पालघरची निर्मिती आपल्या काळात झाली. कारण ठाण्यात सात महापालिका आणि २४ आमदारांचा समावेश असल्याने तो अतिशय मोठा जिल्हा होता. प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून आघाडी सरकारने हे विभाजन केले होते.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
जिल्हा विभाजनाचा प्रश्न पालकमंत्री राम शिंदे यांनी अभ्यास करुन पुढे आणला. त्यामुळे विभाजनाची चर्चा सुरु झाली. जिल्हा विभाजन झाल्यास संगमनेरच जिल्हा व्हावा, असा माझा आग्रह आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा काही प्रमाणात आपण येथे निर्माण केल्या आहेत. 

विभाजन करुन छोटे जिल्हे करण्यास माझी पूर्वी अनुकूलता नव्हती, परंतु नगर जिल्ह्याची भौगोलिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीतील तफावत लक्षात घेतल्यास दक्षिण नगर जिल्हा होणे आवश्यक वाटते. दक्षिण नगरमध्ये विकासासाठी स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण होणे गरजेचे आहे, असेही थोरात यांनी सांगितले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.