अहमदनगर मध्ये घटस्फोटीत मुलीशी लग्न केल्याने मुस्लिम जातपंचायतीने कुटुंबाला टाकले वाळीत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर जिल्ह्यात लोहगावात मुस्लिम जातपंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडलाय. घटस्फोटीत मुलीशी लग्न केलं म्हणून गेल्या 6 वर्षांपासून या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलंय. हे कुटुंब उपेक्षीताचं जगणं जगतायत. दरम्यान जातपंचायतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फाईल फोटो.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मुस्लिम समाजातील वाघवाले जमातीची ही जातपंचायत आहे. लोणी पोलीस ठाण्यात सात जातपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुस्लीम समाजातील वाघवाले समाजाच्या कुटूंबाला जातपंचायतने वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दोन परिवार आज जातपंचायतमुळे बहिष्कृताचं असह्य जिवन जगतायत. जात पंचायतीच्या विळख्यात आजही अनेक कुटूंब भरडली जातायत.

लोहगावमधील आयेशा अली शेख हीने बालवयात झालेल्या लग्नानंतर आयेशाने काही वर्षे संसार केला आणि सासरी जाच होत असल्याने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला . त्यनंतर माहेरी लोहगाव येथे राहायला आल्यावर आयेशाचे अली बरोबर सुत जुळले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या लग्नाला जातपंचायत आडवी आली आणि जातपंचायतने त्यांना लग्न करायचे असेल तर दिड लाख दंड भरावा लागेल असं सांगितलं.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दंड म्हणजे काय तर ... घटस्फोटीत मुलीशी लग्न करणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा विधी करायचा.. चाळीसावा घालायचा आणि या जोडप्याने समाजापासून दूर राहायचं. समाजातून बहिष्कृत केलेल्या या परिवारासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही किंवा कार्यक्रमासही बोलवायच नाही. अशा प्रकारचं आयुष्य गेली सहा वर्षे हि आयशा आणि अली जगत आहेत. लोहगावला स्वतःचं घरही आहे मात्र आपलं घर सोडून दुसऱ्या गावात उपेक्षिताचं जीवन जगण्याची वेळ या दोघांसह परिवारावर आलीय.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.