श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाट्यावर दुचाकींची धडक एक ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव चौफुला येथे गुरूवार दि.५ दुपारी तीनच्या सुमारास दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन. एकजण जागीच ठार,एक गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हिरडगाव आणि घोडेगावच्या शिवेवर असणाऱ्या कुकडी वितरिका क्र १३ च्या नजीक हॉटेल जय भवानीजवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरात धडक झाली. दोन्ही दुचाकीस्वार वेगात असल्याने वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाक्यांचा पुढील भाग बाजूला तूटून पडला आहे.

या अपघातात कुळधरण ( कर्जत) गावातील फोटो व्यावसायिक राजेश जगताप (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर समोरून जोरात धडक बसल्यामुळे राक्षसवाडी येथील गणेश मेहत्रे ( वय २४) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे .
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
हेल्मेटमुळे वाचले प्राण .
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कर्जत वरुन श्रीगोंद्याकडे जात असलेल्या गणेश मेहेत्रे यांनी हेल्मेट होते. अपघात झाल्यानंतर त्यांच्या डोक्यातील हेल्मेट बाजूला उडून पडले. मात्र त्यांच्या डोक्याला जास्त इजा झाली नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.