नगर जिल्‍ह्याचे विभाजन करण्‍यास विरोध नाही - राधकृष्‍ण विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नगर जिल्‍ह्याचे विभाजन करण्‍यास विरोध नाही. जिल्‍ह्याचे मुख्‍यालय कोणते असावे असा आग्रहही आम्‍ही कधी धरला नाही. शासनाला नगर जिल्‍ह्यांसह राज्‍यातील इतर जिल्‍ह्याचे विभाजन करायचेच असेल तर याबाबची भूमिका स्‍पष्‍ट झाली पाहीजे असे मत व्‍यक्‍त करतानाच संगमनेर जिल्‍हा यापुर्वीच व्‍हायला पाहीजे होता. महसुल विभाग संगमनेर तालुक्‍याकडेच होता. तुमच्‍या सहीने पालघर जिल्‍हा होतो तर मग संगमनेर का नाही झाला?’ असा सवाल विरोधी पक्षनेते राधकृष्‍ण विखे पाटील यांनी संगमनेर जिल्‍हा मागणी कृती समितीला केला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर जिल्‍हा मागणी कृती समितीने विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांची गुरुवारी लोणी येथे भेट घेतली आणि जिल्‍हा विभाजनाबाबत आग्रही भूमिका घेण्‍याची मागणी केली. शिष्‍टमंडळाने संगमनेर जिल्‍हा करण्‍याबाबतचे सविस्‍तर निवेदन विखे पाटील यांना सादर केले. शिष्‍टमंडळातील सदस्‍यांनी संगमनेरात सुरु असलेल्‍या आंदोलनाची सविस्‍तर माहीती चर्चेदरम्‍यान विखे पाटील यांना दिली. आत्‍तापर्यंत सव्‍वालाख नागरीकांच्‍या सह्या गोळा केल्‍या आहेत. साखळी उपोषणही आम्‍ही सुरु केले आहे. आमच्‍या भावना शासनापर्यंत पोहचविण्‍याची भूमिका आपण घ्‍यावी अशी मागणी शिष्‍टमंडळातील सदस्‍यांनी विखे पाटलांकडे केली.

राज्‍यात अहमदनगर जिल्‍ह्याबरोबच पुणे, मालेगांव, बीड, सोलापुर या जिल्‍ह्यांच्‍या विभाजनाची मागणीही आता पुढे आली आहे. जिल्‍हा विभाजनासाठी अशा पध्‍दतीची आंदोलने सर्वत्र सुरु झाली तर, सरकारपुढे मोठा पेच निर्माण होण्‍याची शक्‍यता वर्तवून विरोधी पक्षनेते म्‍हणाले की, प्रशासकीय बाबींबरोबरच जिल्‍हा विभाजनासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. आर्थिक संकटात असलेले राज्‍य सरकार जिल्‍हा विभाजनासाठी आर्थिक तरतुद कशी करणार याकडे लक्ष वेधून ना.विखे पाटील म्‍हणाले की, शेतकरी कर्जमाफी, सातवा वेतन आयोग याची आर्थिक आव्‍हान सरकारपुढे आधिच आहेत. त्‍यामुळे जिल्‍हा विभाजनाच्‍या प्रश्‍नाला सरकार कितपत गांभिर्याने घेईल याकडे त्‍यांनी शिष्‍टमंडळाचे लक्ष वेधले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
संगमनेर जिल्‍हा व्‍हावा यासाठी कृती समितीने सुरु केलेल्‍या आंदोलनाचे गांभिर्य सरकारच्‍या लक्षात आणून देण्‍यासाठी कृती समितीच्‍या शिष्‍टमंडळाची भेट मुख्‍यमंत्र्यांसमवेत आपण घडवून आणू संगमनेरात सुरु केलेल्‍या साखळी उपोषणाला भेट देण्‍यासही मला कोणतीही अडचण नाही. पण संगमनेर जिल्‍हा होण्‍यासाठी यापुर्वीच संधी होती. कारण महसुल विभाग आपल्‍या तालुक्‍याकडेच होता. पालघर जिल्‍ह्याच्‍या विभाजनाचा निर्णय झाला, त्‍याचवेळी संगमनेर जिल्‍हा होण्‍याचा निर्णय का झाला नाही. असा सवाल विरोधी पक्षनेत्‍यांनी संगमनेर जिल्‍हा मागणी कृती समितीच्‍या सदस्‍यांना केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.