भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर ! महामेळाव्यात गटबाजी,मुंडे समर्थकांची घोषणाबाजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडी मैदानावर भाजपचा महामेळावा सुरु होण्याआधी भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. स्टेजवर मुख्य मंडपामध्ये भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो न लावल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले . 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करुन आपली नाराजी व्यक्त केली. गोपनीथ मुंडेंवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडेंनी घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच होती.


भाजपने आज 38 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महामेळावा आयोजित केला होता. राज्यभरातील भाजपचे जवळपास 5 लाख कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहिले. भाजपने या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला आहे. त्यामुळे मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली होती.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
शिवसेनेचा दसरा मेळावा तसेच अलीकडेच मुंबईत झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यापेक्षा दुप्पट गर्दी जमवून विरोधकांना संदेश देण्याची भाजपची रणनीती आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.