महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वादावर पडदा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भगवानगड दसरा मेळाव्याच्या वेळी राजकीय भाषणावरुन महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात जो वाद निर्माण झाला होता, त्यावर काहीसा पडदा पडल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तागडगाव येथे नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री प्रथमच एकत्र व्यासपीठावर आले.

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
नामदेव शास्त्रींचं दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. मोठ्या मनाने महंत नामदेव शास्त्रींना मनापासून वंदन करत असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली. दोघांच्या वादावर पडलेल्या पडद्यामुळे उपस्थित भाविक आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साह पाहायला मिळाला.

''संत भगवानबाबांनी आपल्याला वैभवशाली परंपरा दिली असून समाज एकसंघ रहायला पाहिजे,'' असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं. शिवाय हे सप्ताहाचं व्यासपीठ असून आपण इथे राजकीय भाषण करणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
धर्माचं क्षेत्र हे धार्मिक कार्यक्रमांसाठीच असायला हवं, असं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे. तेच सूत्र मी देखील पाळणार आहे. राजकारण करण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.

''राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोन फार मोठ्या शक्ती असून प्रकृती आणि प्रवृत्तीचा संहार करायची ताकद यामधून निर्माण होऊ शकते. संत भगवानबाबांच्या श्रद्धेपोटी फाटकी लुगडी घालणारी माता-माऊली देखील कोरी नोट देण्याचे औदार्य दाखवतात. जीवनात वचनाला फार मोठं महत्व असून अधर्माच्या बाजूने राहिल्यामुळेच कर्णाचाही पराजय झाला. मी मंत्री म्हणून नव्हे, तर संत भगवानबाबांची लेक म्हणून सप्ताहाला आले,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.