आगामी काळातही भाजपचीच सत्ता येणार - माजी मंत्री बबनराव पाचपुते.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप हा सर्वसामान्यांनाबरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. काही पक्ष म्हणजे ठराविक कुटुंब असे त्यांची ओळख आहे, भाजप मात्र यास अपवाद असून हे सामूहिक नेतृत्व आहे. सबका साथ सबका विकास अशी ध्येय धोरणे असल्याने पक्षाला देशात व राज्यात चांगले यश मिळाले आहे. उद्या हि भाजपचीच सत्ता येईल,असा ठाम विश्वास माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी व्यक्‍त केला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
6 एप्रिल रोजी मुंबई येथे होणाऱ्या पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत पाचपुते बोलत होते ते पुढे म्हणाले, सरकारच्या काळात रस्ते, वीज, पाणी, सौर ऊर्जा आदींसारखे प्रश्न मार्गी लागल्याने शहरे सुंदर दिसू लागली आहेत. लोकांमध्ये उत्साहचे वातावरण आहे. त्याच अनुषंगाने पक्षाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशातून पक्षचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमास मोठी उपस्थिती दाखवून शक्तीप्रदर्शन करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, बाबासाहेब भोस, सदाशिव पाचपुते, यांनी केले आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
बैठकीस सभापती पुरुषोत्तम लगड, नगराध्यक्ष मनोहर पोटे, पोपटराव खेतमाळीस, गणपतराव काकडे, लक्ष्मण नलगे, सतीश पोखरणा, गणपत परकाळे, नगरसेविका सुनीता शिंदे, नगरसेवक अशोक खेंडके, सतीश मखरे, बापूशेट गोरे, उपसभापती प्रतिभा झिटे, डॉ.सुवर्णा होले, स्मिता तरटे, बेबीताई मगर, संतोष लगड, दत्ता हिरणावळे, राऊत नाना, संतोष इथापे, शंकर कोठारे, संदीप नागवडे, रमेश गिरमकर, नंदकुमार कोकाटे, संतोष रायकर, संतोष खेतमाळीस, बाळासाहेब थोरात, अमोल शेलार, सुनील महाडिक आदीं उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.