संघाशी नाव जोडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारें

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू असल्याचा आरोप केला आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा हजारे यांनी गुरूवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या पत्रकात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, मला आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा मुद्दा घेऊन कल्पाना इनामदार या गोडसे यांची नात असल्याच्या आणि त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सुत्रे आण्णांनी सोपवल्याच्या बातम्या गेल्या दोन तिन दिवसात चर्चेत आहेत. वास्तविक पाहता कल्पना इनामदार आणि माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलन सुरु होणार म्हणून विविध राज्यातील नवीन जे कार्यकर्ते पुढे आले त्यामध्ये कल्पना इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाचे कोणतेही सुत्र सोपविलेली नव्हती. समन्वय समितीमधील प्रत्येक कार्यकर्त्याने आंदोलनाची जी कामे विभागून घेतली त्यानुसार कल्पना इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती.

या आंदोलनाची सर्व सुत्रे मी स्वत: हाताळीत होतो. मात्र आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने केलेल्या कटकारस्थानामुळे कल्पना इनामदार यांना नथुराम गोडसेंशी जोडले गेले. तसेच कल्पना इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सुत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणाऱ्या चौकडीला भानच राहिलेले नाही.

आंदोलनापूर्वी लोकमत वृत्तपत्रातील नागपुरचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी असाच धादांत खोटा लेख प्रसिद्ध करून अण्णा हे संघाचे कार्यकर्ते असल्याचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे‘लोकपत्र’ या वृत्तपत्राने कल्पना इनामदार यांच्या संबंधीची खोटी बातमी छापून त्यातील मुद्दयांना कोणताही आधार नसताना अण्णा संघाच्या कसे जवळ आहेत हे भासविण्याचा प्रयत्न केला.

सोशल मिडीयावर काही मंडळींनी मुद्दामहून त्यावर चर्चा करून त्यात भर घातली. याच वृत्तपत्राने यापूर्वीही एक हिन दर्जाची खोटी लेखमाला प्रसिद्ध करून मला व आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे माजी मंत्री नबाब मलिक यांनी एबीपी माझा या चॅनलवर चक्क खोचा आरोप करताना असे म्हटले आहे की, अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन त्यानंतर सामाजिक काम सुरू केले. अशा प्रकारे विशिष्ठ वर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून जाणिवपूर्वक बदनामी करण्यात येत आहे.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
वरील सर्व बाबींचा कसून शोध घेतला असता काही मंडळी अण्णा हजारे व आंदोलन यांना जाणिवपूर्वक बदनाम करण्याचे रॅकेट चालवित असल्याचे दिसून आले. मी गेली 25 वर्षे समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्ष, पार्टी व व्यक्तिचा विचार न करता मी आंदोलने करीत आलो. मात्र ज्या प्रमाणे दुकानातील रेडिमेड कपडे कुणाला ना कुणाला येतच असतात. पण त्यांना असे वाटते कि, हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही जरी व्यक्ती, पक्ष, पार्टी समोर ठेवून आंदोलन करीत नसलो तरी अशा लोकांना आमचे आंदोलन कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा बाजुने केलेले भासते.

आमच्या आंदोलनामुळे राज्यातील प्रमुख पक्षपार्ट्यांच्या मंत्र्यांना ते भ्रष्ट ठरल्यामुळे घरी जावे लागले. त्यात सर्वच प्रमुख पक्षांचे मंत्री आहेत. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना आंदोलनामुळे भ्रष्ट ठरून सदर पक्षांची मोठा हानी झालेली आहे हे नाकारता येत नाही. पण स्वतः भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. आंदोलनामुळे राजकिय पक्षांची ‘धरावे तर चावते आणि सोडावे तर पळते’ अशी अवस्था झाली आहे.

सातत्याने खोट्या आरोपांद्वारे मला व आंदोलनाला संघाशी जोडून विविध मार्गांनी वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊन चळवळीचे नुकसान होते आहे. तसेच समाजात दुषित वातावरण निर्माण होत आहे. सातत्याने होणाऱ्या बदनामी मुळे माझे वय ऐंशी वर्षाचे झाले असले तरी एक नवी लढाई लढण्यासाठी मी पुन्हा ऐंशी वर्षांचा तरूण झालो आहे. माझी अनुभवी वकिलांशी चर्चा सुरू असून अशा प्रकारे बदनामी करणाऱ्या लोकांविरूद्ध लवकरच उच्च न्यायालयामध्ये बदनामीचा खटला दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.