डॉ. सुजय विखेंच्या कार्यक्रमात अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ. सुजय विखे यांच्या जनसेवा फाउंडेशनने आयोजित केलेला सक्षम महिला पारनेर महोत्सव आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच आयोजित करण्यात आला. सामाजिक उपक्रमाच्या बुरख्याआड खरेतर निवडणुकीचेच राजकारण जोडले गेले होते. डॉ. विखे लोकसभेची निवडणूक नगर दक्षिण मतदारसंघातून लढवणार हे जवळजवळ निश्चित झाले अाहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यांचा पक्ष कोणता आहे, याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे. हा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे. पण पारनेर तालुक्यात गटबाजीने पोखरलेली काँग्रेस त्यांच्याबरोबर होती. तिच्या जोरावर विखे कशी निवडणूक लढवतात, ही बाब औत्सुक्याची ठरणार आहे.

एकेकाळी पारनेर मतदारसंघ बाळासाहेब विखे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. ते लोकसभेत अनेक वेळा निवडून गेले, त्यात पारनेर तालुक्याचा वाटा मोलाचा असायचा. त्यांनी आपला स्वतंत्र गट या तालुक्यात निर्माण केला होता, परंतु लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पारनेरचा समावेश नगर दक्षिण मतदारसंघात झाला व विखे यांच्या हक्काच्या कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे रूपांतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाले. शिर्डी लोकसभा आरक्षित झाल्याने विखे यांना खासदारकीपासून थांबावे लागले. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
आता डॉ. विखे यांनी खासदारकीसाठी आपण नगर दक्षिणचे उमेदवार असल्याचे स्वत:च जाहीर केले आहे; पण पूर्वीचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पारनेरमध्ये मात्र सध्या चित्र वेगळे असल्याचे दिसत आहे. पारनेर पंचायत समितीत काँग्रेसला बहुमत नसताना ते दोन सदस्यांच्या जीवावर सत्तेत आले. असे असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार विजय औटी यांना केलेल्या मदतीचा फायदा झाला. 

औटी यांनी त्यांना कान्हूर पठार पंचायत समिती गटातून शिवसेनेचा उमेदवार न देता त्या ठिकाणी कम्युनिस्ट, काँग्रेस व सेना अशी युती करून त्यांना तिथून निवडून आणण्यास मदत केली. शिवसेनेच्या मदतीने निवडून आल्यानंतर राहुल झावरे यांनी पुढे सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीबरोबर जाऊन सभापतिपद पदरात पाडून घेतले. 

अशा कुबड्या घेत मिळालेली सत्ता काय कामाची, अशी तालुक्यात चर्चा आहे. डॉ. विखे यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी केली असून, त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. पारनेर येथे त्यांनी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद््घाटन केले. 

सक्षम महिला महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. टीव्ही कलाकार आणूनही खूप गर्दी खेचण्यात अपयश आले. जमलेल्यांतही सर्वसामान्य जनता व तालुक्यातील मतदार किती होते, याचे आत्मचिंतन करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. महिला बचत गटांच्या स्टॉलला अजिबात प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. मोठी उलाढाल होईल या मानसिकतेने आलेल्या सर्व बचत गटांची निराशा झाली.

डॉ. विखेंपुढे आव्हान
डॉ. विखे हे आपण कोणत्याच पक्षात नसल्याचे सांगितले असले, तरी सध्यातरी ते काँग्रेसचेच दिसत आहेत. सक्षम महिला महोत्सवाच्या कार्यक्रमात तालुका काँग्रेसचीच लुडबूड दिसत होती. त्यातील एक गट विखेंना आपण किती तुमचे निष्ठावंत समर्थक आहोत, हे दाखवण्याची एकही संधी कार्यक्रमादरम्यान सोडत नव्हता. दुसऱ्या गटाला हा गट डावलत असल्याचे चित्र दिसत होते. तशी कार्यकर्त्यांत जोरदार चर्चाही रंगली. डॉ. विखे दोन्ही गटांना कितपत एकत्र आणू शकतात, त्यावर काँग्रेसची वाटचाल व विखेंचे यश अवलंबून आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.