आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडून दडपशाही !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्यातील कांगोणीचे सरपंच व ग्रामसेवकांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा १८ जणांविरुद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या दडपशाहीमुळे कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाबाबत मुंबईतील आझाद मैदानावर कांगोणी येथील अलका बाबासाहेब रावडे व कुटुंबीयांनी उपोषण केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रावडे यांनी निवेदनात म्हटले आहे, आमच्या कुटुंबातील १८ सदस्य गेल्या ४० वर्षांपासून कांगोणी येथे रहात आहेत. गेल्या २ वर्षांपासून सरपंच, ग्रामसेवकांकडून पदाचा दुरूपयोग करत सरकारी निधीचा भ्रष्टाचार करून आमच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. जिल्हा पातळीवरील सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकप्रतिनिधींच्या दडपशाहीमुळे अद्याप आम्हाला न्याय मिळाला नाही.

शौचालयासंदर्भात खोट्या आरोपाखाली आमच्या कुटुंबातील ९ व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला गेला. खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, सरपंचाच्या प्रत्येक सहीची पडताळणी करून बनावट सह्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, यासह अनेक मागण्या निवेदनात आहेत. या निवेदनावर बाबासाहेब रावडे, तान्हाजी रावडे, मंदा रावडे यांच्यासह अठराजणांच्या सह्या आहेत. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
आमदार मुरकुटे नाहक बदनाम. रावडे कुटुंबीयांनी अडवलेल्या रस्त्यावर २५ हून अधिक कुटुंबे ये-जा करतात. तोच रस्ता या कुटुंबाने शौचालय बांधून अडवल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे आल्याने ते पाडण्यात आले. केवळ राजकीय आकसातून हे उपोषण केले जात आहे. या कुटुंबावर सरकारी यंत्रणेने गुन्हा नोंदवला आहे. आमदारांना नाहक बदनाम केले जात आहे.'' बंडू शिंदे, सरपंच, कांगोणी.
आमदारकी फक्त पाहुण्यांसाठी ? नेवाशाच्या आमदारांना तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांची काळजी नसून फक्त मेहुणे, ठेकेदार पाहुणे यांचीच काळजी अाहे. त्यांच्याचसाठी मुरकुटे यांनी आमदारकी पणाला लावली आहे, असा आरोप रावडे यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.