लोकसभा निवडणूक लढवल्यास जिंकून दाखवणार - प्रशांत गडाख

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मला तुम्ही तालुक्यातून बाहेर पडू देत नाहीत, तालुक्यातच अडकून ठेवले आहे. तुम्ही जर मला साथ देत तालुक्यातून मोकळे केले तर जिल्हाच काय आपण राज्यसुध्दा हलवू शकतो. मी जर खासदारकीला नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उभा राहिलो तर निवडून येऊनच दाखवील त्यात कसलीच शंका नाही. असे सूचक वक्तव्य करत तालुक्याचे तरुण नेतृत्व प्रशांत गडाख यांनी केले असून आपण नगर दक्षिण मतदार संघातून निवडणुकीच्या अखाड्यात उतरण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मंगळवारी दुपारी तालुक्यातील नवीन चांदगाव येथे सेंट्रल बँकेच्या मिनी शाखेत झालेल्या घोटाळ्यात होरपळून निघालेल्या ग्राहकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी लढा उभारून नवीन चांदगाव, बाभुळवेढा, उस्थळदुमाला येथील ग्राहकांचे पैसे मिळवून दिल्याबद्दल सर्व खातेदारांच्यावतीने प्रशांत गडाख यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पांडुरंग खंडागळे अध्यक्षस्थानी होते.

काही महिन्यांपूर्वी नवीन चांदगाव येथे सेंट्रल बँकेच्या मिनी शाखा चालकाने मोठा आर्थिक घोळ करून लाखो रुपयांना ग्राहकांना फसवले होते. त्या विरोधात प्रशांत गडाख, सुनीता गडाख यांनी ग्राहकांच्या पाठिशी ठामपणे उभा राहात पैसे परत मिळवून देणार असल्याचा शब्द दिला होता. ग्राहकांनी बँकेच्या विरोधात केलेल्या आंदोलनात गडाख यांनी सक्रीय सहभाग घेऊन बँक अधिकार्यांना चाळीस दिवसांच्या आत पैसे द्या अन्यथा बँक चालू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला होता.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
गडाख यांच्या रेट्यामुळे या परिसरातील ग्राहकांना पैसे मिळाले होते. श्री. गडाख यांनी सांगितले की राजकीय कार्यक्रम तर नेहमीच होत असतात. परंतु आजचा कार्यक्रम हा कृतज्ञता व्यक्त करणारा आहे, खरेतर आज समाजाला या कृतज्ञतेच्या भावनेची जाणीव होणे अवश्यक झाले आहे. कदाचीत मी तुम्हाला पैसे परत मिळवून देण्यात मदत केली, म्हणून तुमच्या मनात कसलीही शंका बाळगू नका की आता हा प्रशांत गडाख तमुच्याकडे येईल अन निवडणुकीत आम्हाला मते द्या असे म्हणेल तर हे साफ चुकीचे आहे.

मी तुम्हाला यासंदर्भात कधीच मताचा आग्रह धरणार नाही. कारण आजच्या एकमेकांप्रती मदतीची भावना कमी होत चालली आहे. जीवाला जीव देणारी माणसे मिळणे दुरापास्त होत चालले आहे. त्यामुळे एकमेकाच्या पाठिशी उभे राहून मदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. खरे तर या आंदोलनात मी फक्त तुम्हाला मदत केली. तुम्ही आंदोलनासाठी धीर धरून उतरलात म्हणून हे सर्व शक्य झाले आहे. परंतु ज्या काही ग्राहकांचे पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये. ते पैसे शंभर टक्के तुम्हाला परत मिळतील त्याची जबाबदारी माझी असल्याचा विश्वास श्री. गडाख यांनी दिला.

पुन्हा विखे-गडाख लढत पहायला मिळणार ?
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत गडाख हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमदेवार असल्याची चर्चा चालू होती, मात्र त्याबाबत प्रशांत गडाख यांनी मौन बाळगत या विषया संदर्भात चुप्पी साधली होती. मात्र आज चांदगाव येथील छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी केलेले वक्तव्य बरेच काही सांगून जात असून आपण देखील सध्या जोरदार तयारीला लागलेल्या सुजय विखे यांच्याशी लढत देण्यास तयार असल्याचे सुचित केले आहे. असे झाल्यास पुन्हा एकदा राज्याला विखे-गडाख लढत पहायला मिळणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.