पालकमंत्री शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून शासकीय अधिकारी जामखेडला येईना !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड येथील शासकीय कार्यालयात कायमस्वरुपी अधिकारी नाहीत, यामुळे नागरिकांबरोबरच शेतकऱ्यांची कामे खोळबंली आहेत. याला जबाबदार पालकमंत्रीच असून, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या त्रासाला कंटाळूनच शासकीय अधिकारी जामखेडला येत नसल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसल यांनी केला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दि.३ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल, या वेळी ते बोलत होते.
या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना, जामखेड तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात तूर, उडीद, हरभऱ्याची पीक घेतले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून शासनाने चालू वर्षापासून हरभरा केंद्र सुरू केले. परंतु हे हरभरा खरेदी केंद्र जामखेडऐवज़ी जाणीवपूर्वक खर्डा येथे सुरू करण्यात आले. 

जामखेड शहराचा वाढता विस्तार व जामखेड तालुका मराठवाड्याच्या सरहद्दीवर असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. याच कारणामुळे शहरातील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणूस व्यवसायासाठी जागा घेऊ शकत नाही, त्यामुळे सुशिक्षित बेकार तरुण रस्त्यालगत शासनाच्या मालकीच्या जागेमध्ये व्यवसाय करत होते; परंतु प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली शहरातील काही भागातील अतिक्रमणे काढली, त्यामुळे हे तरूण रस्त्यावर आले आहेत. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
याचा विचार करून शासनाच्या मालकीच्या नवीन बसस्थानक परिसर, जुने बस्थानक परिसर, खर्डा चौक येथील जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये शॉपिंग सेंटर उभारून सुशिक्षित बेकार तरुणांचे पुनर्वसन करण्यात यावे. वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने व कमी दाबाने वीज़ मिळत असल्याने पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत, यामुळे अखंडित व पूर्ण दाबाने वीज़ मिळावी, तसेच भारनियमन कमी करण्यात यावे, अशा विविध मागण्या या वेळी करण्यात आल्या. तहसीलदार विजय भंडारी यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.