फक्त टीआरपी वाढविण्यासाठी डॉ.सुजय विखेंची जिल्हा विभाजनावर टीका !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जिल्हा विभाजनावर राज्याच्या महसूलमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी सुतोवाच केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपण हां विषय सविस्तरपणे मांडला आहे.जिल्ह्याचे विभाजन निश्चित होणार असून योग्य वेळी मुहूर्त सांगू , असा स्पष्ट निर्वाळा देतानाच या विषयावरून माझा अभ्यास करू म्हणणाऱ्यांच्या वल्गना केवळ स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी केल्या जात असल्याचा टोला राज्याचे जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉ सुजय विखे यांना लगावला आहे. 

-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
काल मंगळवार रोजी दुपारी पालकमंत्री शिंदे यांनी शिल्पकार कांबळे यांच्या प्रमोद कांबळे आर्ट स्टुडिओला भेट देऊन पाहणी केली.प्रचंड मेहनतीतून कांबळे यांनी तयार केलेली शिल्पे, मूर्ती, विविध चित्रांचा संग्रह आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आणि कांबळे यांना धीर दिला. कांबळे यांचे सांत्वन केले.यावेळी शिंदे यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

यावेळी उपस्थित पत्रकारांशी शिंदे यांनी संवाद साधला.जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यांवरून जामखेड येथील दौऱ्यात डॉ सुजय विखे यांनी पालकमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.त्याकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री शिंदे म्हणाले , जे पिढ्यां पिढ्या सत्तेत आहेत त्यांना जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही.आपणच या मुद्द्यावर पुढाकार घेत भूमिका मांडली.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा विभाजनावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सुतोवाच केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आपण हा विषय सविस्तरपणे मांडला आहे.त्यामुळे जिल्हा विभाजन निश्चत होणार असून योग्य वेळी मुहूर्त सांगितला जाईल असा विश्वास शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्ह्यातील जनतेनं माझ्या घोषणेचं स्वागत केले आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, पिढ्यांपिढ्या सत्तेत राहूनही जिल्हा विभाजन ज्यांना करता आलं नाही ते माझा अभ्यास करण्याची भाषा बोलत आहेत.त्यांच्या वल्गना केवळ स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी- टिकवून ठेवण्यासाठी केल्या जात असल्याचा टोला पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉ सुजय विखे यांना लगावला आहे. जिल्हा विभाजनाचे जनतेतून स्वागत होत असताना त्यामुळं कोणाला धोका वाटतोय ? असा बोचरा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.