तरुणीवर अत्याचार करून तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील वाटेफळ येथे राहणाऱ्या २४ वर्षाच्या तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून पुणे व शिर्डी येथे अत्याचार करुन तिला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विकास बाळासाहेब नरसिंगे (चांदवड, जि.नाशिक), सचिन रामचंद्र निलाखे (रा.महादेव नगर, मांजरी रोड हडपसर, पुणे), बाबुराव (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरूद्ध शिर्डी पोलिसांत अत्याचार व जिवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाटेफळ परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षाच्या तरुणीस विकास नरसिंगे व त्याच्या दोन साथीदारांनी लग्नाचे आमिष दाखवून प्रथम पुणे येथील बस स्टॅन्डवरील लॉज तसेच शिर्डी येथे वेगवेगळ्या लॉजवर आणून अत्याचार केला. सदर प्रकार २०१६ पासून झाला असल्याचे पिडीत तरुणीने म्हटले आहे.

१ मार्च रोजी गोचिड मारण्याचे औषध पाजून आरोपी व त्याच्या दोन साथीदारांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर तरुणीच्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलिसांत विकास नरसिंगे व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, ३७६ प्रमाणे दाखल केला आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
दरम्यान, शिर्डीत लॉजधारक रुम देताना ओळखपत्रांची खातरजमा न करता रुम देत असल्याने यापूर्वी असे प्रकार उघडकीस आले आहे. अनैतिक कृत्यासाठी लॉज देणाऱ्या लॉजधारकांवर यापुढे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पो.नि. प्रताप इंगळे यांनी म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.