आमदार बाळासाहेब थोरातांकडून अकार्यक्षमतेचा पंचनामा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- टंचाई आढावा बैठकीत आमदार बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करत कानउघाडणी केली. टंचाईवरुन अधिकारी, ग्रामसेवकांची एकमेकांवर होत असलेली ढकलाढकल बघताना शितावरुन भाताची परीक्षा करत थोरात यांनी हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नसल्याचे सुनावत मागणी होताच पाण्याचे टँकर देण्याचे आदेश सोमवारी दिले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आमदार थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठक झाली. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जि. प. कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, महावितरणचे डी. डी. गोसावी, कृषी अधिकारी कारभारी नवले, जि. प. सदस्य मिलिंद कानवडे व रामहरी कातोरे यावेळी उपस्थित होते.

सद्यस्थितीत तालुक्यात पाण्याचा एकही टँकर सुरू नाही. सहा प्रस्ताव आले असून त्यापैकी दोन मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवले असल्याचे, तसेच १ कोटी २९ लाख खर्चाचा टंचाई आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली. त्यात हस्तक्षेप करत थोरात यांनी प्रशासनाच्या या कागदी अहवालाचा पंचनामा करत महिन्यापासून चौधरवाडी येथे मागणी होऊनही टँकर का सुरु झाला नाही, अशी विचारणा केली.

महिनाभरात पाणी जाऊ शकत नाही, यात काय कार्यक्षमता दाखवली असा सवाल करत तुमचे काम चांगले चालले आहे, असे समजू नका. भूजलच्या दाखल्यांसाठी ग्रामसेवक, ग्रामस्थांना हेलपाटे मारायला लावू नका. प्रांताधिकाऱ्यांनीदेखील जबाबदारी घेऊन टंचाईच्या अनुषंगाने बैठका घ्यावेत, असे आदेश थोरात यांनी यावेळी दिले.

माझ्याकडे प्रस्ताव द्या 
महिनाभरानंतरदेखील टँकर सुरु होत नसल्याने आणि त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे जात नसल्याने माझ्याकडे हे प्रस्ताव द्या, मी जिल्हाधिकाऱ्यांना ते नेऊन देतो. तुमचे काम फार चांगले चालले असे समजू नका, मी त्यांच्याशी बोलतो अशी तंबी आमदार थोरात यांनी देत लोकांना चकरा मारायला लावू नका, तुम्ही कागद हलवा असे सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.