नगर - औरंगाबाद रस्त्यावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर औरंगाबाद महामार्गावरील तवलेनगर परिसरात रस्ता ओलांडत असताना, भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील गुरूचरणसिंग अहलूवालिया यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा एकजन गंभीर जखमी झाला असून, त्याला यासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर असे की, सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नगर औरंगाबाद महामार्गावरील तवलेनगर परिसरात गुरूचरणसींग अहलुवालीया हे व आणखी एकजन दुचाकीवर रस्ता ओलंडत होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकी वाहनांना यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.ही धडक एवढी जोरात होती. त्या दुचाकीचा चक्काचुर झाला. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
तर गुरूचरणसींग अहलुवालीया हे रस्त्यावर आपटल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एकजन या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तोफखाना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.