छिंदमला जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातूनच हद्दपार करा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हजारो शिवप्रेमींनी नगरमध्ये मंगळवारी (दि़ ३) शिवसन्मान मोर्चा काढला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महिला, मुलांसह मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी छिंदमच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.श्रीपाद छिंदम याला १५ दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. २ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत छिंदमला तडीपार केल्याचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी काढला. मात्र, छिंदमला जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यातूनच हद्दपार करा, अशी शिवप्रेमींची मागणी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.