संगमनेर जिल्हा मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरु

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करुन नवा जिल्हा निर्मीती पालकमंत्र्यांनी जाहीर केल्या नंतर जिल्ह्याच्या मुख्यालयावर नवे वाद सुरु झाले आहेत. संगमनेर जिल्ह्याचं मुख्यालय करावं या मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समितीने आता बेमुदत साखळी उपोषणास आज पासुन सुरवात करण्यात आली आहे. या उपोषण स्थळी शहरातील नागरीक भेट देवुन पाठींबा व्यक्त करतायत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गेले दीड महिन्यांपासून संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने तालुक्यातील नागरिकांमध्ये जिल्ह्याचं मुख्यालय संगमनेर व्हावी या मागणीची जनजागृती करण्यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत संगमनेर – अकोले येथील नागरिक सह्या करत मोहिमेला प्रतिसाद देतायेत.आतापर्यंत एक लाख सह्यांचा टप्पा पार केला असून हे आंदोलन आता अधिक तीव्र स्वरूपाचे करत शासनाला जाग येण्यासाठी शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज पासुन शहरात बेमुदत साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली आहे.

संगमनेर पासून इतर तालुके 360 अंश कोनात योग्य पद्धतीने बसतात. तसेच संगमनेरातील आधीच उपलब्ध असणारे भव्य शासकीय कार्यालये, संगमनेरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी, येथील असणारे मोठे सहकार क्षेत्र, नगरजिल्ह्यात सर्वात मोठी बाजारपेठ, आर्थिक क्षेत्र, पुणे-नाशिक-मुंबई या मेट्रो शहराच्या सुवर्ण मध्यावर असलेले संगमनेर शहर अश्या एक ना अनेक बाबींनी संगमनेरच नवीन जिल्ह्यासाठी योग्य पर्याय आहे. तसेच अकोले राजूर सारख्या आदिवासी जनतेला संगमनेरच जवळ असल्याने सर्व जनतेचा कौल पहाता जनतेच्या सोयीसाठी संगमनेरच जिल्हा करावा अशी मागणी संगमनेर जिल्हा कृती समितीची आहे.

आपल्या या मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समितीच्या सदस्यांनी काल मंगळवार पासून बेमुदत साखळी उपोषण पुकारले आहे. जो पर्यंत सर्व निकषांचा विचार करून नवीन जिल्हा मुख्यायला करिता संगमनेर जिल्हाची घोषणा सरकार करत नाही तो पर्यंत आमचे बेमुदत साखळी उपोषण चालूच राहणार. तसेच याशिवाय अधिक तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन उभे करू असा इशाराही संगमनेर जिल्हा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.