श्रीगोंद्यातील एसटी वाहकाचा प्रामाणिकपणा,दोन तोळे सोन्याचे दागिने केले परत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : प्रामाणिकपणा संपत चालला, माणसामधील इमानदारी हरवत चालली असे आपण म्हणतो. परंतु आजही काहीजन इमानदारी टिकवून आहेत. असाच प्रामाणिकपणा दाखवला आहे, तो श्रीगोंदा आगारातील वाहक पदावर कार्यरत असलेल्या सतीश गोरखनाथ उदमले यांनी. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यांनी बसमध्ये सीटवर सापडलेला ऐवज संबंधितास सुपूर्त करून आजही समाजात इमानदारी शिल्लक असल्याचे सिध्द केले आहे.उदमले हे रविवार दि. १ मार्च रोजी दुपारी श्रीगोंदा पुणे या एसटी बसमध्ये वाहक म्हणून ड्युटीवर होते. ही बस स्वारगेटला पोहोचल्यानंतर सर्व प्रवासी बसमधून उतरले. परंतु उदमले यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे संपूर्ण बसमध्ये चक्कर मारून पाहाणी केली. 

त्या दरम्यान त्यांना बसमध्ये तीन नंबर सीटवर एक छोटी लेडीज पर्स दिसली. ती उघडून पाहिली असता, त्यात त्यांना अंदाजे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र व ३७६ रूपये रोख असा ऐवज आढळून आला. तसेच त्या पर्समध्ये आधारकार्ड देखील होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यामुळे तो ऐवज अंजना प्रकाश बोरुडे रा सांडवे,अ नगर येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उदमल यांनी श्रीगोंद्यातील त्यांचे नातेवाई उमेश चाकणे यांना याबाबत सविस्तर कल्पना दिली. व यांच्याकडे सदर ऐवज आज सुपूर्द केल.यावेळी वाहतूक निरीक्षक पालवे, कार्यशाळा अधिकारी होले हे देखील उपस्थित होते. वाहक सतीश उदमले यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.