विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार : खासदार दिलीप गांधी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : प्रभाग ३२ च्या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी केडगावच्या मतदारांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन भाजपला मतदान करावे. भारतीय जनता पार्टीने सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार दिला आहे. ही निवडणूक विरोधी पक्षांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका-टिप्पणी न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगांव प्रभाग ३२ ब च्या पोट निवडणुकीतील भाजपचे उमेदवार महेश सोले यांच्या प्रचारार्थ खासदार दिलीप गांधी यांनी केडगावमधील सचिननगर, अंबिकानगर, पाटील कॉलनी, ओंकारनगर भागात प्रचारफेरी काढून मतदारांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. याप्रसंगी शहर चिटणीस किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, केडगांव मंडल अध्यक्ष शरद ठुबे, शहर उपाध्यक्ष प्रतीक बारसे, धनंजय जामगावकर, चंदन बारटक्के, राहुल रासकर, बाळासाहेब सातपुते आदी उपस्थित हाेते. महेश सोले म्हणाले, प्रभाग ३२ ब चा विकास खुंटल्यामुळे रस्ता, पाणी, ड्रेनेजलाइन या मूलभूत सोयी सुविधांपासून प्रभाग वंचित आहे. ही कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.