बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण,सावकार पोलिसांच्या रडारवर

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : उद्योजक बाळासाहेब पवार यांना डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्यात भाग पाडणाऱ्या त्या नावांबद्दल सध्या नगरमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसही माहिती देत नसल्याने गूढ वाढले आहे.ओम उद्योग समुहाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या कागदपत्रांमध्ये स्टॅम्प पेपर आढळून आला आहे. या पेपरवर सहा जणांचे नावे आहेत. हे सावकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. या पेपरबरोबर कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांनी दिली.

बाळासाहेब पवार यांनी शनिवारी सकाळी स्वत:कडील पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. या आत्महत्याप्रकरणी वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

बाळासाहेब पवार यांच्या कार्यालयाची तपासणी केली. पोलिसांनी या चौकशीत महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागली आहेत. यात स्टॅम्प पेपर देखील सापडला आहे. यावर काही जणांकडून कर्ज घेतल्याची माहिती असून, हे सावकार असल्याचा उल्लेख येत आहे. या सावकारांचे कर्ज फेडले असून, देखील ते तगादा करत असल्याचे त्यात म्हटले आहे. या सावकारांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आठ जणांना त्यांनी जबाबदार धरले आहे. त्यात दोन जण नगरच्या कापड बाजारा तील, दोन जण बुरूडगावचे, दोन जण कर्जतचे आहेत. उरलेल्या आणखी दोन जणांबद्दल गूढ आहे. वरील सर्वांकडून त्यांना व्याजाने पैसे घेतल्याची जोरदार चर्चा आहे. 

त्यांनी पवार यांना तगादा लावल्याने त्यांचे जगणे अवघड झाले होते. दोन जण तर त्यांच्या पेट्रोल पंपावरील जमा झालेला गल्ला दररोज सायंकाळी घेऊन जात असल्याची जोरदार चर्चा आहे. काही बँकांचेही पवार यांच्यावर कर्ज होते. मार्च एंडमुळे त्यांनीही पवार यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तगादा लावल्याचे सांगण्यात येते.

स्टॅम्प पेपरच्या तपासणी करण्याची निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी अक्षर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. दरम्यान, बाळासाहेब पवार यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. या कॅमेऱ्यात झालेल्या चित्रीकरणाचा डाटा देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

या डाटा देखील तज्ञांकडून तपासण्यात येणार आहे. बाळासाहेब पवार यांना भेटण्यासाठी कोण कोण आणि कधी आले होते याची तपासणी करून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.