श्रीनाथ मल्टी स्टेट ठेवीदारांचा रास्ता रोको.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील श्रीनाथ मल्टी स्टेट सोसायटीचे चेअरमन व संचालकांना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रीनाथ मल्टी स्टेट ठेवीदार बचाव कृती समितीच्या वतीने नगर-मनमाड रस्त्यावरील सह्याद्री चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी सुरु झालेल्या या आंदोलनात ठेवीदारांनी रस्त्यावर ठिय्या दिला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. विनोद चव्हाण यांनी आंदोलन कर्त्यांची समजुत काढून, त्यांच्या शिष्टमंडळाची जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घालून दिली. यावेळी शर्मा यांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. कृती समितीचे अध्यक्ष गणेश गिते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात लिंबराज डोंगरे, शिवनाथ शेळके, प्रकाश नवले, डॉ.राजू काळे, अरुणा पाटील आदिंसह ठेवीदार सहभागी झाले होते. 

श्रीनाथ मल्टी स्टेट सोसायटीत अनेक शेतकरी, शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या भविष्याच्या आर्थिक नियोजनासाठी गुंतवणुक केली. या संस्थेत नगर जिल्ह्यातील ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकून पडले आहेत. गरजेच्या वेळी तसेच ठेवीची मुदत संपली असता ठेवीदारांनी आपली ठेवीची परतफेड मिण्यासाठी मागणी केली असता संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी नकार दिला. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
यामुळे ठेवीदारांकडे मुलांचे शैक्षणिक फी भरण्यास देखील पैसे नसल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर काहिंनी आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी या ठेवी ठेवल्या होत्या ते परत मिळत नसल्याने ठेवीदारांवर आत्महत्येची वेळ आल्याचे ठेवीदारांचे म्हणने आहे.पोलिस प्रशासनाने गांभीर्यपुर्वक हे प्रकरण हाताळून तातडीने ऑडीट रिपोर्ट न्यायालयात सादर करावा व संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळाच्या सदस्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.