वाळू तस्करांना महसूलचा दणका, २७ तस्करांना अटक वारंट

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यात बेकायदा गौणखनिज उत्खनन वाहतूक व साठा केल्याप्रकरणी २७ जणांच्या विरोधात १ कोटी ५ लाखांची दंडात्मक कारवाई केली होती. हा दंड न भरल्याने प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्या आदेशानुसार २७ जणांना अटक वारंट बजावण्याचे आदेश श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना दिले आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तसेच या लोकांना पकडून समक्ष हजर करण्याचे देखील आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान महसूल विभागाने असे अटक वारंट काढल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, महसूलच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. .

यामध्ये वाळू व माती तस्कारांनी लाखो रुपयांची माती वाळूउपसा केली. या प्रकरणी २७ जणांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली. त्यांनी दंड न भरल्याने दंडात्मक रकमेचा बोजा सात बारा उताऱ्यावर चढविण्यात आला. त्यास तस्करांनी दाद दिली नाही, म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अटक वारंट बजावण्यात आले आहे. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
हे वॉरंट बजावलेल्यांमध्ये प्रशांत नलगे, आदिनाथ मदने, अजय मदने, विठ्ठलराव मोरे, लक्ष्मण जगताप, देविदास काकडे, पंढरीनाथ पासलकर, भानुदास मोरे (रा.सर्वजण सांगवी दुमाला), मच्छिंद्र सुपेकर (श्रीगोंदा), संभाजी वागस्कर, पोपट रुपनर (सुरोडी), दादा गोला(आर्वी), संजय गिरमकर, मच्छिंद्र जगताप, रंगनाथ गिरमकर, किरण पवार (रा.सर्वजण अजनुज), प्रकाश कन्हेरकर, चंद्रकांत कन्हेरकर, सुरेश बोरूडे, संभाजी खेंडके, नंदु काळे (सर्वजण मांडवगण), प्रकाश जगताप, विनोद जगताप, नितीन पठारे (बनपिंप्री) यामध्ये सर्वात कमी प्रकाश नलगे यांना ३ हजार १०० तर सर्वात जास्त दंड पंढरीनाथ पासलकर यांना ६२ लाख इतका आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.