चारा छावणी गैरव्यवहार ४२६ संस्था चालकांवर गुन्हे दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सन २०१२ - १३, २०१३ - १४ मध्ये उद्भवलेल्या दुष्काळाच्या काळात पशुधन वाचविण्याच्या हेतूने चारा छावण्या सुरु करण्यात आल्या होत्या. या चारा छावणीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्ह्यात ४२६ चारा छावणी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या सर्व गुन्ह्यांच्या बाबत पोलिस दफ्तरी नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या प्रती जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आल्या होत्या. जामखेड मधील २२ छावण्या संदर्भातील वगळता उर्वरित तालुक्यांतून गुन्हे दाखल केल्या बाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे वर्ष २०१२ ते २०१४ अशी सलग दोन वर्ष जिल्ह्यात जवळपास साडेचारशेच्या दरम्यान चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. यापैकी काही चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळली होती. जनावरांची संख्या, चारा उपलब्धता व अन्य विविध मुद्यांच्या अनुषंगाने अनियमितता आढळलेल्या चारा छावण्यांना दंडसुद्धा करण्यात आला होता. 

आता सरकारकडून पुन्हा ज्या चारा छावण्यांच्या कामकाजात अनियमितता आढळली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये अशा एकूण ४२६ छावण्या असून यासर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा, या आठ तालुक्यांमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत.

दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी जिल्ह्यात २०१२ ते २०१४ मधील चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या चारा छावणीत गैरव्यवहार झाल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील गोरख आनंदा घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल केली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या संयुक्त न्यायपीठासमोर ३ मार्च पर्यंत तब्बल १४ वेळेस सुनावणी झाली आहे. फेब्रुवारीच्या प्रथम सप्ताहात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंडळाधिकाऱ्यांमार्फत छावणीचालकांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्याची सुरुवात झाली. ३१ मार्च अखेर सर्व छावणी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती आहे.

तालुकानिहाय दाखल करण्यात आलेले गुन्हे.
नगर - ७१, पारनेर - ४१, पाथर्डी - ३२, कर्जत - १३२ , श्रीगोंदा - ८१, जामखेड - २७, नेवासा - ९, शेवगाव - ३३. अशा एकूण ४०४ चारा छावण्या संस्थांवर गुन्हे दाखल केले असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास मिळाला. जामखेड मधील २२ चारा छावणी संस्था चालकांच्या संदर्भातील गुन्हे नोंदणीचा अहवाल तालुकास्तराकडून काल दुपारपर्यंत प्राप्त झाला नसल्याचे समजते. .

कारवाईमुळे अनेकांची झोपमोड.
चारा छावणी गैरव्यवहार प्रकरणी चारा छावण्यांच्या चालकांविरुद्ध कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कलमानुसार सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. चारा छावणी घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या या कारवाईमुळे अनेकांची झोप उडाली नसेल तरंच नवल.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.