अकोले तालुक्यातील भोंदू बाबाने केले अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने अकोले तालुक्यातील एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना आहे. अनिल तळपे असे आरोपी बाबाचे नाव असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल तळपे पीडित मुलाला ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने बसस्थानकाजवळील एका कॉम्पलेक्समध्ये घेऊन गेला. तिथे आसपास कुणी नसल्याची खात्री करून त्याने मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलाने त्याच्या तावडून सुटका करून घेत तेथून पळ काढला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. यानंतर वडिलांनी तात्काळ ओकोले पोलिसात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.