शेवगावमध्ये चालत्या कंटेनरने अचानक घेतला पेट, 40 लाखांचे नुकसान

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगावमध्ये म्हैसूरहून टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी घेऊन दिल्लीकडे जाणाऱ्या कंटेनरने शेवगाव शहरात रविवारी दुपारी अचानक पेट घेतला. आठवडे बाजार असल्याने शेवगाव शहरात चालत्या कंटेनरने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. 


पण चालक अरुण माळवदे (रा. ढोरसडे, ता. शेवगाव) यांनी प्रसंगावधान दाखवून हुशारीने कंटेनर शेवगाव शहरातून बाहेर नेवासा रोडला नेऊन एका वॉशिंग सेंटरवर थांबवून पाण्याच्या प्रेशरच्या सहाय्याने कंटेनरला लागलेली आग विझवली.आगीत २७ गाड्या जळून खाक झाल्या. ४० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुपारी ४ च्या दरम्यान कंटनेर (एमएच २० डीई ७६९८) भुसारी पेट्रोल पंपाजवळ थांबला. चालक अरुण बापू माळवदे (ढोरसडे, ता. शेवगाव) चहा पिण्यासाठी उतरले असता त्यांना कंटेनरमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. कंटेनरचा दरवाजा उघडला असता आतील दुचाक्या पेटल्याचे लक्षात आले.

त्यांनी तातडीने पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दल व पोलिसांना फोन केला. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, कंटेनरच्या वरच्या भागातील २३ व खालील ४ अशा २७ दुचाक्या जळून खाक झाल्या. कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार या गाड्यांची किंमत ३५ ते ४० लाखांच्या दरम्यान असल्याचे समजते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.