गावठी कट्टयाची विक्री करणार्यांची माहिती द्या आणि 25 हजार रूपयांचे बक्षीस मिळवा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव पाठोपाठ जामखेड दुहेरी हत्याकांडानंतर आक्रमक झालेल्या जिल्हा पोलिसांनी आता जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने जर कोणी बेकायदा गावठी कट्टयाची विक्री करीत असेल तर पोलिसांना कळवा, पोलिसांना थेट माहिती सांगणार्‍याला 25 हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येईल असे आवाहन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 


प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, जी व्यक्ती ही माहिती पोलीसांना कळविल, त्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. ही माहिती थेट पोलीस अधीक्षकांच्या 8888310000 या दूरध्वनीवर द्यावी. कट्टा, पिस्तुल, रिव्हॉल्वर- 25 हजार रूपये, तलवार, चॉपर- 5 हजार, मारामारी करणारे,दहशत करणार्‍या गँगची माहिती-5 हजार, अवैध सावकारी- 2 हजार पर्यंत, अवैध दारू - 2 हजार, अवैध दारू- 2 हजार, अवैध जुगार-2 हजार, गांजा, अफू, चरस, हेरॉईन- 5 हजार, फरार पाहिजे असलेले आरोपी- 5 हजार, वेश्यावृत्ती, कुंटणखाना- 5 हजार, गुटखा, सुगंधी, तंबाखू- 5 हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.