निळवंडे प्रश्न लवकरच मार्गी लावू - डॉ.सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहाता तालुक्यातील जिरायती भागासाठी संजीवनी ठरणारा निळवंडे प्रकल्पाचा प्रश्न विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मार्गी लावू, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. कोऱ्हाळे येथे महापुरुषांच्या संयुक्त जंयती उत्सवानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

निळवंडे प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अपूर्ण काम पूर्ण होऊन निळवंडे प्रश्न मार्गी लागेल. तसेच सर्वसामान्यांसाठी जीवनावश्यक योजनाही त्वरित प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे कामही चालू आहे. ज्यामध्ये रेशनिंग कार्डचे वितरण, राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना, घरकुल योजना यासारख्या योजनांचा समावेश असेल. त्यामुळे सर्वांनी जाती-धर्माचे भेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. सुजय विखे यांनी केले.

यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद कोते, गणेश सह. साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब दाभाडे, सरपंच बाळासाहेब थोरात, जेष्ठ कार्यकर्ते शांताराम मुर्तडक, उत्तमराव डांगे, ग्रामपंचायत सदस्य किशोर ढगे, दत्तात्रय कालेकर, ज्ञानेश्वर डांगे, राजेंद्र कोळगे, नितिन डांगे, कृष्णा मुर्तडक यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.