घारगावला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका तरुणाने आपल्या राहत्या घराच्या आडोशाला दोरीच्या साहय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.२९) दुपारी घडली. अनिल आण्णा बरडे (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,घारगाव पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मुळा नदीच्या कडेला हा तरूण कुटुंबासह राहात होता. रविवारी दुपारी त्याचा भाऊ राजू याने घर उघडले असता तर समोर त्याला अनिल याचा मृतदेह दिसला. घाबरून त्याने जोराने आरडाओरड सुरु केली.

आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना दिली. अनिल याचा मृतदेह खाली घेण्यात आला. शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूगालयात पाठवण्यात आला. अनिल याने आत्महत्या का केली? त्याचे कारण समजू शकले नाही.याप्रकरणी राजू बरडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.