राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटलांच्या निवडीने राहुरीत नवचैतन्य


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी अर्थमंत्री आ.जयंत पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर होताच तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.आठ दिवसापासून प्रदेशाध्यक्षपदी पाटील यांची निवड होणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत होते. काल मात्र खात्रीलायक दुजारा मिळाल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला.

२०१४ मध्ये विधानसभेची उमेदवारी तनपुरे कुटंबियांना नाकारल्यानंतर अनेक तनपुरे समर्थकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधात भूमिका घेऊन शिवसेनेला मदत केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी शिवाजीराव गाडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी डॉ.उषाताई तनपुरे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढविली. परंतु त्यांचा मोठा पराभव झाला होता.

दोन वर्षानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉँग्रेसची झालेली वाताहत भरुन काढण्यासाठी पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. व नगरपालिका निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्यासाठी आग्रह धरला होता. तनपुरेंनी राहुरी नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाच्या झेंड्याखाली लढवून नगरपालिका ताब्यात घेतली. 

नगराध्यक्षपदी प्राजक्त तनपुरे विराजमान झाले. पुढे तनपुरे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस बरोबर जुळवून घेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, डॉ.तनपुरे कारखाना निवडणूक सर्व गट-तट विसरून एकत्र लढवली. त्यासाठी तनपुरे,धुमाळ ,गाडे यांची युती करून जिल्हा परिषदेत दोन जागा व पंचायत समितीची सत्ता त्यांनी सभापतीपदासह काबीज केली. 

नगराध्यक्षपदी प्राजक्त तनपुरे निवडून आल्यांतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामास जोमाने सुरुवात केली आहे. राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यात जनसंपर्क सुरु ठेवला आहे. तनपुरे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जुळवून घेण्यात नुतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. पाटील हे संपूर्ण तालुक्यात 'मामा' या नावाने परिचीत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांची ओळख आहे.त्याचा फायदा आगामी निवडणुकीत होणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.