अखेर राष्ट्रवादीवर सुप्रिया सुळे यांचे वर्चस्व !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची एकमताने निवड झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडीवर अजित पवार यांच्यापेक्षा सुप्रिया सुळे यांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. पुणे येथे पक्षाच्या झालेल्या बैठकीत जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून 3कोणत्याही एका प्रदेशाध्यक्षाला सलग दोन वेळा संधी देण्यात आली नव्हती. मात्र, मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अजित पवार यांच्या आग्रहामुळे सलग दोन वेळा संधी देण्यात आली. तटकरे यांनी आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये पक्षावाढीसाठी फारसे काम केले नसल्याचा पक्षांतर्गत आरोप करण्यात येत होता.

त्यामुळे तटकरे यांना सलग तिसऱ्यांदा प्रदेशाध्यक्ष बनवण्यास खा. सुप्रिया सुळे यांचा विरोध होता, असे समजते. काही दिवसांपासून पक्षातील विविध नेत्यांच्या कामाचा आढावा सुप्रिया सुळे यांच्याकडून घेण्यात येत होता. त्या वेळी तटकरे यांची पक्षवाढीच्या दृष्टीने कामगिरी असमाधानकारक असल्याचे आढळून आले. 

अजित पवार, शरद पवार यांच्या उपस्थितीतच सुप्रिया सुळे यांनी तटकरे यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. या वेळी सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांच्यात अल्पशी शाब्दिक चकमक उडाल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तटकरे यांच्याऐवजी जयंत पाटील यांच्या नावाचा आग्रह पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे धरला. 

विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर जयंत पाटील यांची प्रतिमा उद्योजक तसेच सुशिक्षित राजकारणी म्हणून असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची चागली वाढ होईल, असेही सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सांगितल्याचे कळते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.