अनैसर्गिक अत्याचार करून साडेदहा लाखांची लूट

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एका जणावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची साडेदहा लाख रुपयांची लूट केल्याची घटना घडली आहे. प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. येथील नागापूर शिवारातील इंडियन ऑईलच्या पाठीमागे निर्जनस्थळी दि.२१ एप्रिल रोजी ही घटना घडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मात्र याबाबत शनिवारी (दि. २८) सायंकाळी गुन्हा दाखल करून अटकेची कार्यवाही केली. यात मोहसीन सय्यद, जुबेर सय्यद (दोघे रा. दर्गादायरा रोड, भिंगार) यांचा समावेश आहे. त्यांच्या इतर साथिदारंचा शोध सुरू आहे..

याबाबात सविस्तर असे की, उत्तरप्रदेशातील एकजण १९ एप्रिल रोजी पंजाब येथून ११२ बकरे मालमोटारीत भरून कराडला निघाला होता. २१ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता मालमोटार आरामसाठी नगरला थांबविली. नगर एमआयडीसी भागातील इंडियन ऑईल पेट्रोलपंपाच्या मागे निर्जनस्थळी ट्रकनेवून तेथे शेळ्यांना आरामासाठी उतरविल्या. 

मात्र सायंकाळी ६ वाजता मोहसीन सय्यद व इतर ११ जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी बेदम मारहाण करून अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर १० लाख ५० हजार रुपयांच्या बकऱ्या पळवून नेल्याची फिर्याद या व्यापाऱ्याने एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.