राष्ट्रवादी सोडण्याचा विचार आला तरी आत्महत्या करेन : तटकरे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धर्मनिरपेक्षतेचे सूत्र कायम ठेवून कायम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आपली निष्ठा कायम आहे. ही निष्ठा कायम ठेवून चार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा विचार जरी आला तर मी आत्महत्या करेन, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची सभा आज पुण्यात पार पडली. तटकरे म्हणाले, सत्ता नसताना चार वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. शरद पवार आणि अजित पवार यांनी वेळोवळी संधी दिली. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. 

तालुकाध्यक्षापासून ते प्रदेशाचा अध्यक्ष होऊ शकलो ते केवळ पक्षाचा निष्ठावान सैनिक म्हणून. या पुढे मी कार्यरत राहणार आहे.पक्षाने योग्य वेळी संधी दिली, त्यामुळे विस्तार करता आला. सध्याचे सरकार हे सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. हे अपयश मी पक्षाच्या व्यासपीठावरून हल्लाबोलच्या निमित्ताने जनतेसमोर आणले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.