गवताला आग लागल्याने श्रीगोंद्यात ओमनी व्हॅनचा स्फोट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा शहरालगत कापसे वस्तीजवळ गवताला लागलेली आग ओमनी व्हॅनपर्यंत पसरत जाऊन व्हॅनचा स्फोट झाला. यामुळे शेजारील घरातील संसारोपयोगी वस्तू जळाल्या. या घटनेत सुनील अरुण गोरेहेकिरकोळ जखमी झाले. हा प्रकार रविवारी दुपारी घडला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सुनील अरुण गोरे (रा. कापसेवस्ती ) यांचे पत्र्याचे घर आहे. घराबाहेर त्यांची व्हॅन उभी केलेली होती. व्हॅनभोवती असलेले वाळलेलेगवत रविवारी दुपारी अचानक पेटले. ही आग व्हॅनपर्यंत पोहचली. यानंतर काही वेळातच वाहनाचा स्फोट झाला. जवळच असलेले सुनील गोरे यांना आगीची झळ पोहचली. त्यातच ते बेशुद्ध पडले. त्यांच्यावर श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तुळशीदास उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रशांत गोरे यांनी अग्निशामक वाहन घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठले. आग विझविण्यात आली. परंतु तोपर्यंत गोरे यांच्या चारचाकी वाहनाचा व घरातील संसारोपयोगी वस्तूंचा कोळसा झाला होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.