जामखेड दुहेरी हत्याकांडात चार संशयित अटकेत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात (वय ३०) व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय २५) या दोघांची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची फिर्याद योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

वर्षभरापूर्वी उल्हास माने यांच्या तालमीतील मुलांच्या बरोबर राजकीय फलक लावण्याच्या कारणावरून वाद झाले होते. त्याचा राग मनात घरून गोविंद दत्ता गायकवाड (रा.तेलंगशी) व त्याच्यासोबत असलेल्या चार ते पाच लोकांनी कट करुन योगेश व राकेश यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची फिर्याद कृष्णा राळेभात यांनी जामखेड पोलिसांत दिली आहे.

योगेश हा आष्टी येथे बी.एस.सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून, त्याला पत्नी व एक दीड वर्षाचा मुलगा आहे. राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय २४) यास आईवडील व एक भाऊ आहे. शनिवारी (दि.२८) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जामखेड-बीड रस्त्यालगत बाजार समितीच्या गाळे आहेत. तेथील सोमा काळे याच्या चहाच्या हॉटेलवर योगेश हा राकेश राळेभात मित्रांसमवेत चहा घेत होता. 

सायंकाळी ६.४४ वाजण्याच्या सुमारास दीपक थोरे याच्या मोबाईलवरून फिर्यादी भाऊ योगेश याला कोणीतरी पिस्तूलातून गोळ्या मारल्या आहेत. असा निरोप आला. फिर्यादी ताबडतोब घटनास्थळी गेला असता गोळीबारात जखमी झालेला भाऊ योगेश व राकेश यांना जामखेड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. 

सरकारी दवाखान्यात योगेश गोळ्या लागल्याने जखमी झाला असून, त्याच्या छातीतून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यास दिसले. बाजूच्या कॉटवर राकेश राळेभात हा देखील गोळ्या लागल्याने जखमी अवस्थेत पडलेला होता. ], त्याने सांगितले की, गोविंद दत्ता गायकवाड (रा. तेलंगसी ता.जामखेड) व त्याच्यासोबत ४ ते ५ लोकांनी नियोजित कट रचून आमच्या जवळ मोटारसायकलवरती येऊन मला व योगेशला एक वर्षांपूर्वी उल्हास माने याच्या तालमीतील मुलाबरोबर राजकीय बोर्ड लावण्यावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून पिस्तूलमधून गोळ्या झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

कृष्णा राळेभात याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रस्त्यावर असलेल्या दुकान चालकाचे पत्ते घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. संशयितांना ताब्यात घेतले घेऊन चौकशी सुरु आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.