फ्लेक्स लावण्याच्या वादातून झाले जामखेड हत्याकांड ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्लेक्स लावण्यावरुन झालेल्या वादातून या दोघांची हत्या करण्यात आली, अशी फिर्यात मृताच्या भावाने दिली आहे.

मृत योगेशचा भाऊ कृष्णा याने जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. चार ते पाच जणांनी कट रचला आणि योगेश आणि राकेश यांची दुचाकीस्वारांनी गोळीबार करुन हत्या केली, असा दावा करण्यात येत आहे.

राजकीय फ्लेक्स लावण्याच्या वादातून हत्या झाल्याची तक्रार योगेश राळेभातचा भाऊ कृष्णा राळेभात यांनी दिली आहे. याप्रकरणी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह इतर ४ ते ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.