पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर घुले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सध्या जामखेड मधील वातावरण तणावग्रस्त असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


तीन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर गोळीबार झाला होता, मंत्री राम शिंदे यांचा पोलीस यंत्रणावर वचक राहिला नाही. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघाची अशी अवस्था असेल तर जिल्ह्याची काय अवस्था असेल. असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी उपस्थित केला.

२०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गोळीबार !
राजेंद्र फाळके म्हणाले, या हत्याकांडास पालकमंत्री राम शिंदेच जबाबदार आहे. २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गोळीबार घटना घडवून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालकमंत्र्यांबरोबर राज्यसरकार दोषी असल्याचा आरोप फाळके म्हणाले.

पालकमंत्री शिंदेंकडून तालुक्यातील गुंडाना पोसण्याचे काम !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात म्हणाले, तालुक्यातील गुंडाना पोसण्याचे काम पालकमंत्री राम शिंदे करीत आहेत. तालुक्यात प्रभारी राज ठेवून वाटेल तसे काम राम शिंदे या अधिका-यांकडून करीत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.