अल्पवयीन मुलीला फूस लावून नेले पळवून.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवार दि. २४ एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धांदरफळ याठिकाणी ही अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती.मंगळवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास अमित लहानु माळी याने या अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असून याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अमित माळी याच्या विरुद्ध गु.रजि.नं. ६४/२०१८ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.