राजकीय दबावापोटी 'त्या' सरपंचावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असताना देखील पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील सरपंचावर राजकीय दबावापोटी कारवाई केली जात नसल्याने पिडीत शिंदे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पारनेर तालुक्यातील वाळवणे येथे सोमवार दि.9 एप्रिल रोजी सायंकाळी सरपंच उत्तम पठारे व त्याची बायको अनिता पठारे, पुतण्या दिलीप पठारे व सून निता पठारे यांनी अश्‍विनी शिंदे व सासू शोभा शिंदे यांना जातीवाचक शिवीगाळ करीत पदराला ओढून घराबाहेर काढीत जबर मारहाण केली व विनयभंग केला. या प्रकरणी सरपंचसह पठारे कुटुंबीयांवर सुपा पोलिस स्टेशनला दि.12 एप्रिल रोजी विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सरपंच उत्तम पठारे याने जागेवरुन शिंदे कुटुंबीयांशी भांडणे सुरु केले आहे. सरपंचच्या राजकीय दबावापोटी पोलिस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करीत नसून, अनुसुचित जातीचे असल्याने आरोपी व त्यांचे नातेवाईक दमबाजी करुन अन्याय करीत असल्याचे आश्‍विनी शिंदे यांनी म्हंटले आहे. आरोपींच्या दहशतीखाली गावात दडपणात रहावे लागत असून, आरोपींवर कायदेशीर कारवाई होत नाही, तो पर्यंन्त प्राणांतिक उपोषण चालू राहणार असल्याचे शोभा शिंदे यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.