तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसासह तिघांविरुध्द गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विनाकारण दमदाटी करुन तिघाजणांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. महेश ओमप्रकाश कंडारे (रा. शाहु महाराज हौसिंग सोसायटी) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, दीपक सुभाष वाघेला (रा. प्रबुध्दनगर, आलमगीर, भिंगार), अभिलेख धमेंद्र वाघेला (रा. नेहरु कॉलनी, भिंगार) यांनी महेश याला विनाकारण शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सुभाष नानजी वाघेला (रा. प्रबुध्दनगर, आलमगीर, भिंगार) याने तुझ्याकडे व तुझ्या भावाकडे पाहतो असा दम दिला. 

त्यामुळे महेश यांनी मानसिक तणावामध्ये व धमकीच्या दबावातून दि. १६ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दीपक कंडारे याने दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिसांनी दीपक वाघेला, अभिलेख वाधेला व सुभाष वाघेला यांच्याविरुध्द भादंवि कलम ३०६/३४ अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोसई करेवाड हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.