पूर्ववैमनस्यातून पोलिसाला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पूर्ववैमनस्यातून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली. बादशहा मोहम्मद शेख (रा. सुपा, औदुंबर हाईटस) असे पोलिसाचे नाव आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात याकूब इलाही तांबोळी (रा.रांजणगाव मस्जिद, ता.पारनेर) याचे विरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी की, दि. २७ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वा. आरोपी याकूब इलाही तांबोळी हा मोटारसायकलवरुन (एमएच १५ पीएच ७९५४) घटनास्थळी आला त्याने गचांडी पकडून शेख यांना खाली पाडले.

त्यानंतर त्याने माझी मुले तुझ्या पत्नीने डांबून ठेवली आहेत ते मला परत दे, असे म्हणून पुन्हा गचांडी पकडून पोलिस अधीक्षकांकडे चल असे म्हणून, शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. याबाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी याकूब तांबोळी याचे विरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सपोनि बी.एस. पाटील हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.