केडगाव हत्याकांडातील संशयाची सुई कोतकर कुटुंबियांकडे, सुवर्णा कोतकर यांचीही होणार चौकशी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील रहस्य उलगडण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून सर्व अंगांनी कसून तपास चालू आहे. हत्याकांड स्थानिक राजकारणातूनच झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्याकांडातील संशयाची सुई भानुदास कोतकर यांच्या कुटुंबियांकडे फिरत असल्याने पोलिस भानुदास कोतकर यांच्या शोधार्थ आहे. भानुदास कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा झालेली आहे. मात्र, नगर जिल्हा बंदीच्या अटीवर त्यांना जामीन मिळालेला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जामीनावर असलेले भानुदास कोतकर यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी घटनेच्या दिवशी भानुदास कोतकर यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण केले. ते संभाषण नेमके काय झाले ?यासाठीही सुवर्णा कोतकर यांचीही लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

केडगाव दुहेरी हत्याकांडात संशयीत असलेला मुख्य सुत्रधार विशाल कोतकर याला अटक केल्यानंतर हत्याकांडाचे बरेच रहस्य समोर आले. हत्याकांडात बळी पडलेल्या संजय कोतकर व वसंत ठुबे यांनी रवि खोल्लमला मोबाईलद्वारे धमकावले होते. हे संभाषण विशाल कोतकर व रवी खोल्लम माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना ऐकविले. 

तद्नंतर सुवर्णा कोतकर यांनी सासरे भानुदास कोतकर यांच्याशी मोबाईलद्वारे संभाषण केले. सासरे व सुनामध्ये नेमके काय संभाषण झाले? याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिस यंत्रणा सर्व बाजूने कसून चौकशी करत आहेत. त्यासाठी त्यांना भानुदास कोतकर यांना ताब्यात घ्यावयाचे आहे. श्री. कोतकर यांच्या शोधार्थ पोलिस पथके तपासाची चक्रे वेगाने फिरवत आहेत.

पुणे, मुंबई या ठिकाणी श्री. कोतकर असल्याचे समजताच त्याठिकाणीही पोलिसांनी शोध घेतला. मात्र, श्री. कोतकर पुणे व मुंबई या ठिकाणी आढळून आले नाही. दरम्यान श्री. कोतकर यांनी पोलिसांकरवी आपण राजकारणाचा संन्यास घेतला असून त्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. मात्र, त्या निवेदनाबाबत पोलिस यंत्रणेने फारसे गांभीर्याने घेतले नसून श्री. कोतकर यांच्या चौकशीसाठी पोलिस यंत्रणेचा जोरदार प्रयत्न आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.