नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच जामखेडमध्येही केडगावच्या घटनेची पुनर्रावृत्ती घडल्याने नगर जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. केडगावच्या घटनेत शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. तर जामखेडच्या घटनेत राष्ट्रवादीच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जामखेड शहरातील बीड रोडवरील मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलसमोर शनिवार दि.२८ रोजी अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकलवरून येऊन अचानक अंदाधुंद केलेल्या गोळीबारात योगेश आंबादास राळेभात (वय २८) व राजेश अर्जून राळेभात (वय २३) हे दोघे तरूण गंभीर जखमी होवून. उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.