शनिवार अहमदनगर करांसाठी घातवार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील बाजार समिती परिसरातील एका हॉटेलसमोर तीन अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकलीवर येऊन केलेल्या सिनेस्टाईल अंदाधुंद गोळीबारात योगेश अंबादास राळेभात (२८) व राकेश अर्जुन राळेभात (२३) या दोघांचा मृत्यू झाला. योगेशला चार, तर राकेशला दोन गोळ्या लागल्या होत्या. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
घटनेनंतर योगेशचा लगेच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या राकेशचा नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले.केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड शनिवारीच ७ एप्रिलला घडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा शनिवारी पिस्तुलातून गोळ्या झाडून जामखेडला दोघांची हत्या करण्यात आली. या घटनांमुळे पोलिस खाते हादरले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.