शिंदे साहेब तुम्ही अहमदनगरचे बिहार केले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर जखमी दोन्ही तरुणांना उपचारासाठी जामखेड रूग्णालयात दाखल केले होते. तेथे अर्धा तास डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. अखेर उपचाराआभावी जामखेड ते नगर हा प्रवास करीत असताना दोघांनी प्राण सोडले. त्यामुळे पालकमंत्र्याचा मतदारसंघ असूनही योग्य त्या सुविधा मिळाल्या नाहीत, असा आक्रोष व्यक्त करीत जमावाने प्रा. राम शिंदे यांना जिल्हा रूग्णालयात घेराओ घालून कोंडले होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शनिवारी सायंकाळी गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरूणांना नगरला उपचारासाठी हलविण्यात आले. मॅक्सकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मयत घोषीत केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथे एकच गर्दी जमली. हा प्रकार पालकमंत्री राम शिंदे यांना समजला. ते देखील रुग्णालयात पोहचले.

दरम्यान त्यांच्याभोवती काही कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली. नेमके काय घडले, हे जणून घेत असताना अचानक त्यांच्यावर संतप्त जमावाकडून शाब्दीक हल्लाबोल सुरू झाला. शिंदे साहेब तुमच्या मतदार संघात चाललय काय? किरकोळ भांडणे झाली तरी पिस्तुलातून गोळीबार केला जातो. तुम्ही नगरचे बिहार केले. काल केडगावात दुहेरी हत्याकांड घडले तर आज तुमच्याच मतदार संघात दोघांची हत्या झाली. याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यानंतर ना.राम शिंदे रूग्णालयाच्या आत गेले असता जामखेडच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे गेट बंद केले. यामुळे पालकमंत्री आत कोंडले गेले. बाहेर जमाव त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होता. तुमच्या मतदार संघात तुमचे लक्ष असते तर या दोन तरुणांचा बळी गेला नसता. तुम्हालाच या गुन्ह्यात आरोपी करावे, अशी आमची मागणी आहे. असे या जामावातील काही जण संतापाने सांगत ना.शिंदे यांच्यावर रोष व्यक्त करत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.