पालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघात गुंडाराज,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोघांचा गोळीबारात मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादीच्या दोघांचा मृत्यू झाला. पालकमंत्री राम शिंदेंच्या जामखेड मध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांचे हत्याकांड घडल्यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे. 

नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामधील बाजार समितीमध्ये गोळीबार झाला असून या गोळीबारात योगेश राळेभात वय (28) व राजेश राळेभात वय (२६) अशी या दोन कार्यकर्त्यांची नावे आहेत.गोळीबारानंतर ते दोघही एकाच जागेवरच पडून होते. 

राष्ट्रवादी युवक काँगे्रसचा जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय ३०) व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात हे दोघे दुकानासमोर बसलेले असताना सायंकाळी सव्वा वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून तीन अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यांनी गावठी कट्ट्यातून योगेश व राकेश यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या़ त्यानंतर तीनही हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते.परंतु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे दोन्ही रुग्ण उपचाराअभावी अर्धा तास पडून होते. अर्ध्या तासाने वैद्यकीय अधीक्षक सी. व्ही. लामतुरे आल्यानंतर प्राथमिक उपचार करून जखमींना नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गोळीबारानंतर जखमींना तातडीने नगरमधील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले़ परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.