मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार गांधींनी २० दिवसांनी तोंड कसे उघडले?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर शहरात स्थानिक स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना पोसणारा राजकीय दलाल तसेच राजकीय उंची व लायकी नसलेल्या खासदाराने शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका करणे म्हणजे उंदराने वाघावर टीका करण्याचा हास्यास्पद प्रकार असल्याचा पलटवार शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

उंदराने वाघावर टीका करणे हास्यास्पद 
केडगावमध्ये झालेल्या दोन शिवसेना पदाधिकारांच्या हत्येप्रकरणी बोलताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी भाजप खासदार दिलीप गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘उंदराने वाघावर टीका करणे हास्यास्पद आहे. मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांनी २० दिवसांनी तोंड कसे उघडले? असा खडा सवाल राठोड यांनी खासदार गांधी यांच्यासमोर उपस्थित केला आहे.

खासदार नाही तर खावदार
दिलीप गांधीवर टीका करताना राठोड म्हणाले की, ‘हे खासदार नसून खावदार आहेत. यांच्या मुलाची एलईडी लाईटची कंपनी आहे. हे चायनीज दिवे लावून स्वत:चा विकास करत आहेत. राज्याच्या प्रश्नांवर बोलणाऱ्याचा पक्ष हा फक्त छिंदम पुरताच आहे. तसेच युती ठरवणारे हे कोण? तुमचे नगरसेवक तरी किती ?

हत्येनंतर केडगावमधून का पळाले?  
स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही त्यांची शिवसेना पक्षप्रमुखावर बोलण्याची लायकी आहे का?’, अशा शब्दात राठोड यांनी त्यांचा समाचार घेतला. तसेच, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जर पुन्हा टीका केली तर या खासदार दिलीप गांधीला जिल्ह्यात फिरू देणार नाही’, असा इशारा राठोड यांनी दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Blogger द्वारा समर्थित.