राज्य सरकार निकम्मे वाटते तर कशाला सरकारमध्ये राहता ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकार निकम्मे वाटते तर कशाला सरकारमध्ये राहता, असा सवाल करुन मनपातील सत्ताधारी निकम्मे असल्यानेच आम्ही त्यांच्याबरोबर नाहीत, अशा शब्दात खा. दिलीप गांधी यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर शरसंधान साधले. मुख्यमंत्र्यांचे काम चांगले आहे. त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली आहेत. या गोष्टींच्या त्रासामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात असल्याचेही ते म्हणाले.

खा. दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, किशोर बोरा उपस्थित होते. खा. गांधी म्हणाले, शिवसेनेकडे कोणाताही विकासाचा अजेंडा नाही. केवळ प्रसिध्दीसाठी भाजप सरकारवर टीका केली जाते. सरकार निकम्मे वाटते तर कशाला सरकारमध्ये राहता. मनपातील सत्ताधारी निकम्मे असल्याने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही.

सत्ताधार्‍यांना शहराचा कोणताही विकास करता आला नाही. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही. ‘फेज टू’ पाणी योजना 2012 पर्यंत पूर्ण होणे गरजेचे असताना 2018 साल उजाडले तरी ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. मनपात नगरसेवकांपेक्षा ठेकेदारच जास्त आहेत. त्यामुळे नगर शहर विकासापासून वंचित राहिले. दक्षता समितीच्या बैठकीत, मी अपूर्ण काम ठेवणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने शहरातील पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

शहर व जिल्ह्यातील घटनांवर बोलताना ते म्हणाले की, नगर जिल्हा राज्यातील उत्तम जिल्हा असून या घटनांमुळे जिल्हा बदनाम होत आहे. आतापर्यंत राजकीय परिवाराने कधीच गुंडगिरीला मदत केली नाही. जिल्ह्यात ‘गुंठामंत्री’ही तयार झाले नाहीत. व्यक्तीगत घटनांनाही सार्वजनिक स्वरूप देण्याचा प्रकार निराधार आहे. आतापर्यंतच्या सर्व घटनांचा अहवाल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविला असल्याचे ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Blogger द्वारा समर्थित.