दगडफेक करणार्या त्या शिवसैनिकांची नावे निष्पन्न,दोषींवर लवकरच कारवाई होणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शनिवार दि. ७ एप्रिल रोजी दोघा शिवसेना पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद केडगाव परिसरामध्ये उमटत रास्ता रोको व दगडफेकीच्या घटना घडल्या. याप्रकरणी दहा शिवसैनिकांची नावे आत्तापर्यंत पोलिसांनी घटनेच्या दिवशी केलेल्या व्हिडीओ चित्रीकरणातून निष्पन्न झाली आहेत.

काही नावे यापूर्वीच गुन्ह्यात समाविष्ट असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी दिली. याप्रकरणी आणखी नावांची ओळख पटविण्याचे काम सुरु असून दोषींवर लवकरच कारवाईचे संकेत पोलिस प्रशासनाने दिले आहे. .

केडगाव येथे शनिवार दि. ७ रोजी पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या दोघा पदाधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. यावेळी संतप्त जमावाने रास्ता रोको करत परिसरात दगडफेक केली. याप्रकरणी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ६०० कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे.

मात्र, याप्रकरणी अद्याप एकाही जणाला अटक करण्यात आलेली नसून दोन दिवसापूर्वीच गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी शिवसैनिकांविरुद्धचे पुरावे सादर करा त्यानंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलिस प्रशासन पुरावे शोधण्याचे काम करत असून आत्तापर्यंत दहा जणांची नावे याप्रकरणी निष्पन्न झाली असून आणखी काही जणांचा यापूर्वीच गुन्ह्यात समावेश असून लवकरच त्यांच्यावर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.